Jalna Tur Market Rate  pudhari photo
जालना

Jalna Tur Market Rate : दोन दिवसांत तुरीच्या भावात अडीचशे रुपयांची वाढ

आता दर १०,७०० रुपयांवर तर रेशीम कोषाला ७६ हजारांचा उच्चांकी दर!

पुढारी वृत्तसेवा

जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार, (दि.१९) रोजी शेतमालाची मोठी आवक झाली. गत दोन दिवसांपूर्वी बाजारात १० हजार ४५० रुपये इतका भाव होता. यात अडीचशे रुपयांची वाढ होऊन आता तुरीला सुमारे १० हजार ७०० रुपये दर मिळाला आहे. येत्या काळात तुरीच्या भावात अशाच प्रकारे वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, दिवसभरात एकूण १५ हजार ३८८ क्विंटल शेतमालाची आवक नोंदवली गेली असून सुमारे ९ कोटी ५४ लाख ४२ हजार ४९१ रुपयांची प्रचंड आर्थिक उलाढाल झाली आहे. यात सर्वाधिक आवक पिवळ्या सोयाबीनची झाली असून, तुरीने व रेशीम कोषाने दराचा उच्चांक गाठला आहे. पांढऱ्या तुरीला बाजार समितीत जोरदार मागणी दिसून आली. तुरीला कमाल १० हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलचा उच्चांकी दर मिळाला, तर सर्वसाधारण भाव १० हजार २२५ रुपये राहिला.

याशिवाय, पांढऱ्या रेशीम कोषाची १ क्विंटल आवक झाली असून त्याला कमाल ७६,००० रुपये प्रतिक्विंटल असा चांगला भाव मिळाला. अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक परमेश्वर वरखडे व सचिव भरत तनपुरे यांनी दिली. बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनची तब्बल ११ हजार ५६७ क्विंटल एवढी आवक झाली. सोयाबीनला किमान ५,९०० रुपये तर कमाल ७,३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. सोयाबीनचा सर्वसाधारण भाव ६,९०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. एकट्या सोयाबीनची ७ कोटी ९८ लाख रुपयांपेक्षा जास्त उलाढाल झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT