शहागड प्रतिनिधी: अबंड तालुक्यातील वडीगोद्री बस स्थानकाजवळ मंगळवारी अकरा वाजण्याच्या सुमारास शहागड कडून जालनाकडे जात असलेल्या हायवा ट्रक क्र. एम.एच.12 पी.09016 ने अचानक तांत्रिक बिघाड होऊन धावत असतांना पेट घेतला.
हायवा ट्रक चालक गोविंद भीमराव प्रधान वय 35 वर्ष रा. करंजळा रा.अबंड याने प्रसंगावधान राखत हायवा जागेवरच बंद करून उडी घेतली. यामुळे तो बाल -बाल बचावला. हा हायवा ट्रक संभाजी पवार शहागड यांच्या मालकीचा असून या हायवाचे दहा लाख रुपयाचे नुकसान झालेले असून, घटनेची माहिती मिळताच पोलीस जमादार फुलचंद हजारे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तत्पूर्वी आजूबाजूच्या नागरिकांनी व चालकांनी हायवा विजवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत हायवाच्या समोरचे संपूर्ण केबिन जळून खाक झालेले होते. तांत्रिक बिघड झाल्याने हायवा ट्रकने चालू असतांना पेट घेतला यात समोरचे संपूर्ण कॅबिन जळून खाक झाले.