मृत विद्यार्थी प्रथमेश कृष्णा नेमाने  
जालना

Jalna News | झोका खेळता खेळता गळ्याला लागला फास; पाचवीतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू!

जळगाव सपकाळ येथील घटना, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

पुढारी वृत्तसेवा

पारध: झोक्याशी खेळताना गळफास लागून पाचवीत शिकणाऱ्या प्रथमेश कृष्णा नेमाने या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि. २३) सकाळी जळगाव सपकाळ येथे घडली. या घटनेने नेमाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेशचे आई-वडील रविवारी सकाळी सुमारे १० वाजता पाहुण्यांना भेटण्यासाठी मादणी येथे गेले होते. त्यावेळी प्रथमेश हा आपल्या दिव्यांग भावासोबत घरी होता. घरातील झोक्याशी खेळताना गिरक्या घेत असताना झोक्याचा फास त्याच्या गळ्याला लागल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेत प्रथमेशचा मृत्यू झाला.

प्रथमेश हा जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पाचवीत शिक्षण घेत होता. अभ्यासात हुशार, मेहनती आणि अत्यंत जबाबदार विद्यार्थी म्हणून तो परिचित होता. लहान वयातच त्याच्यामध्ये कामाची जाणीव निर्माण झाली होती. वडिलांच्या इलेक्ट्रिक दुकानात तो नियमितपणे मदत करत असे. शाळेत जाण्यापूर्वी दुकान उघडणे, परिसराची स्वच्छता करणे अशी कामेही तो आवडीने करत होता.

लहान वयातच जबाबदारीने वागणाऱ्या प्रथमेशच्या अचानक जाण्याने ग्रामस्थांनाही मोठा धक्का बसला आहे. खेळता-खेळता काळाने हिरावून नेलेल्या या चिमुकल्याच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण जळगाव सपकाळ परिसर हळहळला आहे. नेमाने कुटुंबीयांच्या आक्रोशाने वातावरण सुन्न झाले असून, गावात सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT