गोंदी पोलीस वसाहतीमध्ये जप्त हायवा ट्रकसह पोलीस  Pudhari Photo
जालना

जालना: वाहतूक नियमांचे उल्लंघन; ६ हायवा ट्रकवर कारवाई

Jalna News | गोंदी पोलिसांकडून ५५ हजारांचा दंड वसूल

पुढारी वृत्तसेवा

शहागड, पुढारी वृत्तसेवा : वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी आणि अवैध वाहतुकीस आळा घालण्यासाठी गोंदी पोलीस ठाणे हद्दीत विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या ६ हायवा ट्रकवर जप्तीची कारवाई करत ५५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला.

वाहनावर अस्पष्ट नंबर प्लेट, इन्शुरन्स, लायसन नसणे, अशा सहा हायवा वाहनावर गोंदी पोलिसांनी कारवाई करत न्यायालयात हजर केले असता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बलभीम राऊत, शहागड पोलीस चौकीचे उपनिरीक्षक इब्राहिम शेख, माऊली कंटुले, अशोक नागरगोजे, फुलचंद हजारे, गणेश मुंडे, गोपाल दिलवाले, शाकेर सिद्दिकी, दीपक भोजने, सुशिल करंडे, अशोक कावळे, बाबासाहेब पठाडे यांनी विशेष मोहीम राबवली. यावेळी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक खांडेकर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT