परतुर : तहसिलदार डॉ. प्रतिभा गोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील पाच आरोपीला बेड्या ठोकल्या असून तिघांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तर शनिवारी रात्री दहा वाजता पोलिसांनी जेसीबी जप्त केली. असून आरोपीवर हद्दीपारची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिस निरिक्षक एम.टी. सुरवसे यांनी दिली आहे.
परतूर येथील अवैध गौण उत्खनन करणाऱ्या मध्यरात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास खाजगी वाहनाने कारवाईसाठी महीला तहसिलदार प्रतिभा गोरे या गस्तीवर असताना इंदिरानगर जवळ आंबा रोड लगत एक जेसीबी हायवा मध्ये अवैध मुरूम भरत असतांना तहसीलदार त्या दिशेने जात असताना जेसीबी व हायवा चालकाने वाहने घेऊन पळ काढला. पळून जात असतांना जेसीबीचा टायर खराब झाल्याने जेसीबी थांबला. जेसीबीची फोटो तहसीलदार फोटो काढत असतांना सहा ते सात जणांनी तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्यावर हल्ला चढवत शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. आणि जेसीबी आणि हायवा पळवून नेला होता.
तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी परतुर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अखिल बिल्डर, इलियास कुरेशी, अमजत कुरेशी, इरफान युनुस कुरेशी, जुनेद, व इतर दोन असे सात आरोपी विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
परतूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीच्या शोधात पथके पाठवून अमजत खाजा कुरैशी, एजाज कादर खान, सुजाहिद मतीन खतिब यांना अटक करून न्यायालयात शनिवारी हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तर आरोपी इलियास खाजा कुरैशी, जुनेद रफिक शेख यांना पोलिसांनी शनिवारी अटक करून जेसिबी जप्त केली आहे. आरोपींवर तडीपारीची कारवाई होणार आहे.