भरधाव टॅंकरने धडक दिल्याने कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. File Photo
जालना

जालना : भरधाव टॅकरची कारला धडक, एक ठार

Jalna Accident : ढोणवाडी फाट्याजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

आष्टी : परतूर तालुक्यातील ढोणवाडी कुंभार पिंपळगाव रस्त्यावर डिझेल संपल्याने एक कार रस्त्यावर उभी होती. यादरम्यान समोरून भरधाव वेगात आलेल्या टॅंकरने जोराची धडक दिल्याने कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात मंगळवार (दि.७) ढोणवाडी फाट्याजवळ झाला असून याप्रकरणी मृताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरुन गुरुवार (दि.९) आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात टॅकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ईंगेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खाली पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT