जालना

Jalana Accident news : अंबड-जालना रस्त्यावरील शहापुरजवळ दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक; २५ ते ३० प्रवासी जखमी

ST bus collision Shahapur : जालना वडिगोद्री राष्ट्रीय महामार्ग ७५३ वरती वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत

पुढारी वृत्तसेवा

शहापूर : अंबड-जालना मार्गावरील अंबड तालुक्यातील शहापूर येथे गल्हाटी नदीच्या पुलावर दोन एस टी बसेसची समोरासमोर धडक होऊन २५ ते ३० प्रवाशी जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.4) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.

जालना येथुन बीडच्या दिशेने जाणारी अंबड आगाराची बस क्रमांक (एम एच १४ बी टी ३०२२) व भांबेरी येथुन अंबड येथे शाळेचे वि‌द्यार्थी घेऊन जाणारी अंबड आगाराची बस क्रमांक (एम एच १४ एम एच १७५०) या दोन बसेसची शहापूर येथील गल्हाटी नदीच्या पुलावर समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोन्ही बसमधील प्रवासी व वि‌द्यार्थी असे एकुण २५ ते ३० जण जखमी झाले.

या भीषण दोन्ही बसेसचे चालक व वाहक हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती समजताच परीसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बसमधुन बाहेर काढून तात्काळ अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. यामध्ये दोन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत.

अरुंद पुलामुळे वारंवार अपघात...

जालना वडिगोद्री राष्ट्रीय महामार्ग ७५३ वरती शहापूर येथील गल्हाटी नदिवरील पुल हा अत्यंत अरुंद स्वरूपाचा असुन त्यामुळे या पुलावर वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT