जालना ः शहरात लूटमार करून मोबाईल पळविणाऱ्या टोळीतील पकडण्यात आलेल्या आरोपीसह पोलिस अधिकारी व कर्मचारी. pudhari photo
जालना

Jalna Crime : जालना शहरात लूटमार करणारी टोळी जेरबंद

आठ मोबाईल व दुचाकीसह पोलिसांनी केला मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

जालना : कदीम जालना पोलिसांनी लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दोन गुन्ह्यांचा उलगडा केला असून एका आरोपीसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत विविध कंपनीचे आठ मोबाईल फोन व एक दुचाकी असा सुमारे 2 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास टिपू सुलतान चौक, रेल्वे स्टेशन परिसरात तसेच रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास महानगरपालिकेजवळ फिर्यादींचे मोबाईल अज्ञात इसमांनी मोटारसायकलवरून आलेल्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले होते. या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सागर रवी अंमोरे या आरोपीसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून आठ मोबाईल फोन व एक मोटारसायकल असा 2 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ

जालना शहरात मागील काही दिवसांत लूटमार करण्याच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे.रिक्षामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशास लूटमार करण्याच्या घटनेनंतर आता दुचाकीवरून येऊन मोबाईल हिसकावून नेणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी शोध लावून जेरबंद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT