अपघातग्रस्त दुचाकी  छाया : अकबर शेख
जालना

जालना: ऊसाने भरलेल्या बैलगाडीला दुचाकीची धडक; अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Road Accident: वडीग्रोद्रीजवळील डाव्या जायकवाडीच्या कॅनॉल जवळ झाला अपघात

पुढारी वृत्तसेवा

शहागड : अबंड तालुक्यातील सोमवारी सकाळी सात वाजता औदुंबर हॉटेल जवळ राष्ट्रीय महामार्ग 52 वर वडीग्रोद्रीजवळील डाव्या जायकवाडीच्या कॅनॉल जवळ बीड जिल्ह्यातील पाटोद्याहून छत्रपती संभाजीनगर येथे परीक्षेसाठी जाणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची दुचाकी विरुद्ध दिशेने येणाऱ्या उसाने भरलेल्या बैलगाडीला धडकली. या अपघातात चैतन्य वैद्यनाथ जायभाये (वय 20)रा. काकडहिरा, ता. पाटोदा, जि. बीड या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला.

पाटोदा तालुक्यातील काकडहिरा येथील चैतन्य वैद्यनाथ जायभाये हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. त्याची छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी परीक्षा होती. ही परीक्षा देण्यासाठी चैतन्य पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास काकडहिरा येथील घरून छत्रपती संभाजीनगरकडे दुचाकीवर निघाला होता. सकाळी वडीगोद्री डाव्या कालव्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऊस वाहतूक करणाऱ्या ऊसाने भरलेल्या बैलगाडीला दुचाकीची जोरदार धडक बसली. त्यात चैतन्य गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT