सुखापुरी फाटा येथे खासगी बस व टेम्पोमध्ये भीषण अपघातात झाला.  (Pudhari Photo)
जालना

Jalna Accident | खासगी बस - टेम्पोचा भीषण अपघात; २ ठार ७ जण जखमी; लग्नाला जाताना घटना

अंबड तालुक्यातील सुखापुरी फाटा मध्यरात्री अपघात

पुढारी वृत्तसेवा

Bus Tempo Accident Sukhapuri Phata Ambad

शहापूर : अंबड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ७५३ वर सुखापुरी फाटा येथे खासगी बस व टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघातात २ जण ठार झाले. तर ७ जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि.२३) मध्यरात्री १२ च्या सुमारास घडली.

अधिक माहिती अशी की, जालनाहून परळी येथे लग्न समारंभासाठी बस (एम एच ४६ बी बी १७३२) जात होती. तर केज येथून भोकरदन येथे मजुरांना घेऊन टेम्पो (एम ०४ एफ जे ८९८३) जात होता. या दोन वाहनांचा सुखापुरी फाटा येथे भीषण अपघात झाला. यात अंजना पुरुषोत्तम सपनार (वय ३०, रा. धानोरा, ता. सेलगाव, जि.हिंगोली) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनुसया पुरुषोत्तम सपनार (वय १४) हिचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.

बाबासाहेब नाथराव सपनार (रा‌.धानोरा, ता.सेलगाव, जि.हिंगोली), संदिपान उमाजी शेप (वय ६०, रा. शेपवाडी, ता‌. अंबाजोगाई), सतिश गणेश लबडे (वय ३५, रा. तडेगाव), गयाबाई बाबुराव भोंडे (वय ६५, रा. शिराढोण), रामचंद्र फड (वय ५५, कनेरवाडी), विनय दिलीप नेहरकर (वय २१, रा. परळी) , यश फुल्लारे (वय २०, रा.परळी) हे गंभीर जखमी झाले. जखमींना जालना येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ‌

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT