जालना : घनसावंगीतून निवडणूक लढवणारच : सतीश घाटगे File Photo
जालना

जालना : घनसावंगीतून निवडणूक लढवणारच : सतीश घाटगे

पुढारी वृत्तसेवा

घनसावंगी: घनसावंगी विधानसभा निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी काही विपरीत निर्णय घेऊ नये. नसता वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असे सतीश घाटगे यांनी भाजपा निरीक्षकांजवळ आपले विचार मांडताना सांगितले. घनसावंगी विधानसभा मतदारसंघात भाजपा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पक्ष श्रेष्ठींना मतदारांच्या प्रतिक्रिया तसेच त्यांच्या भावना जाणुन घेण्यात आल्या.

यावेळी बोलतांना घाटगे म्हणाले की, जनतेने मला त्यांच्या मनातील उमेदवार ठरवले आहे. त्यामुळे मी आता कोण्या पाहुण्याचा तसेच नातलगाचा विचार करत बसणार नाही. मी ही निवडणूक लढवणार आहे. कारण या मतदार संघाचा मी पूर्ण अभ्यास केला आहे. जनतेचे प्रश्न देखील कामाच्या रुपाने सोडविली आहेत. त्यामुळे आता झालेल्या सर्व तयारीची आता परीक्षा आहे. माझ्या जागेवर दुसऱ्या कोणाला परीक्षा देऊ देणार नाही.

जोपर्यंत शांत आहे, तोपर्यंत तुमचा आहे. मला डावलले तर मी जनतेचा असल्याचे घाटगे बोलले. यावेळी गौतम गोलेच्छा, बद्री भाऊ पठाडे, विजय कामत, रामेश्वर भांदरगे, शिवाजी बोबडे, सिद्धिविनायक मुळे, रमेश तारगे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

घनसवांगी विधानसभा मतदार संघाला विकासाचे मॉडेल करायचे असेल तर येथे भाजपाच उमेदवार पाहिजे. भारतीय जनता पार्टीसाठी अहोरात्र झटलो आहे. मोदीना पंतप्रधान करायचे होते तेव्हा वाडी, तांडे गाव फिरलो. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना जे टरबूज्या म्हणून हिनवायचे टिंगल करायचे आता त्यांना जवळ करायचे का? असा सवाल त्यांनी केला. वारंवार मतदार संघात हरणाऱ्याला बाजूला करा असे ते म्हणाले.

कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या, त्या वरिष्ठांपर्यंत पोहचवणार आहे. घनसावंगीची जागा भाजपाला आणि सतीश घाटगेनाच मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मतदार संघात ६६ लाख महिलांना १५०० रुपये महिना सुरू केला आहे.
-बद्रीनाथ पठाडे, जिल्हाध्यक्ष

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT