खुलताबाद ( जालना ) : सुनील मरकड
आगामी खुलताबाद नगरपालिका निवडणुकीत मतदार पक्षाच्या चिन्हाकडे पाहून मतदान करतील की योग्य उमेदवार निवडून देतील, याबाबत शहरात चर्चेला उधाण आले आहे. गेल्या काही निवडणुकांत मतदारांनी पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तीच्या कार्यक्षमतेला प्राधान्य दिल्याचे चित्र दिसले होते. त्यामुळे यावेळीही जागरूक मतदारांचा कल कोणाकडे झुकतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
शहरातील विकासकामे ठप्प असल्याने अनेक मतदारांमध्ये नार-ाजी आहे. काही ठिकाणी तर नागरिक थेट म्हणत आहेत की, आता आश्वासनांवर नाही, तर काम करणाऱ्यांवर विश्वास ठेवू. त्यामुळे मतदारांचा मूड समजून घेण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.
दरम्यान, अनेक नवीन चेहरे राजकारणात उतरले असून, तरुण उमेदवारही मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सक्रिय झाले आहेत. शहरात पक्ष नव्हे, व्यक्ती महत्त्वाची असा सूर उमटू लागला आहे. दरम्यान, अनेक नवीन चेहरे राजकारणात उतरले असून, तरुण उमेदवारही मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सक्रिय झाले आहेत. शहरात पक्ष नव्हे, व्यक्ती महत्त्वाची असा सूर उमटू लागला आहे.
यावेळी खुलताबादचे मतदार पक्षनिष्ठा बाजूला विकासाभिमुख आणि प्रामाणिक उमेदवारालाच संधी देतील का? हे येणाऱ्या निकालात स्पष्ट होईल. ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व असलेले आजही खुलताबाद शहर विकासापासून कोसो दूर असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. नगरपालिकेच्या हद्दीत अनेक मूलभूत सुविधा अद्याप अपुऱ्या असून, नागरिकांना दररोज अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नगरसेवक / नगराध्यक्ष यांच्या कार्यकाळात साधे स्वच्छतागृह कुठे शहरात दिसत शालेय विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी उद्यान नसल्याची खंत नागरिक पुढाऱ्याकडे व्यक्त करत आहेत. शहराचा विकास फक्त निवडणूक जाहीरनाम्यात नगरपालिकेचा दर्जा मिळून अनेक वर्षे लोटली असली तरी खुलताबाद शहर आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. शहरात अद्याप पक्की ड्रेनेज लाईन व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहते आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर रूप धारण करते. दरम्यान, शहरात एकही सुसज्ज क्रीडांगण नसल्याने स्थानिक तरुणांना खेळांसाठी योग्य जागा मिळत नाही. निवडणुका येतात आणि जातात, पण ड्रेनेज व क्रीडांगणाचा प्रश्न कायम प्रलंबितच आहे. शहराचा विकास फक्त निवडणूक जाहीरनाम्यांत दिसतो, प्रत्यक्षात मात्र सुविधा नाहीत, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून मिळत आहे.