जालना : पोलिसांनी १० ब्राससह जप्त केलेल्या दोन हायवा.  pudhari photo
जालना

Jalna illegal sand mining : अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

१० ब्रास वाळूसह ४८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

जालना : जालना पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या धडक कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणारे दोन हायवा अडवून सुमारे १० ब्रास वाळूसह तब्बल ४८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन चालकांविरुद्ध हसनाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधातील मोहिमेला आणखी बळ देत जालना पोलिसांनी सोमवारी (दि. २०) मध्यरात्री कारवाई करत दोन हायवा, त्यामधील सुमारे १० ब्रास वाळूसह एकूण ₹४८ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिस अधीक्षक तेगबीर सिंह संधू व अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यावेळी वाळूने भरलेले दोन हायवा येताना दिसताच पोलिसांनी त्यांना अडवून तपासणी केली.

तपासणीत दोन्ही हायवामध्ये प्रत्येकी सुमारे पाच ब्रास वाळू असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत क्रमांक नसलेले दोन टाटा कंपनीचे हायवा आणि त्यामधील वाळू असा एकूण ₹४८ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी संदीप मनोहर काळे (रा. पिंपळगाव गांगदेव, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) व यकीन जमील शेख (रा. लतीफपूर, ता. भोकरदन, जि. जालना) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि योगेश खटकळ, पोलिस कर्मचारी प्रताप सुंदरडे, निखिल गायकवाड, सोमेश्वर सुरवसे तसेच हसनाबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी चौधरी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे.

गुप्त माहितीआधारे रचला सापळा

गुप्त माहितीच्या आधारे अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी यांच्या विशेष पथकाने रात्री सुमारे १.४० वाजण्याच्या सुमारास भोकरदन-हसनाबाद मार्गावरील गोषेगाव फाट्यानजीक सापळा रचला. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT