जालना : मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी एका विधिसंघर्षग्रस्त बालकासह एका जणास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. ५ नोव्हेंबर रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजय एकनाथ टेकाळे याच्याकडे चोरीची शाईन मोटारसायकल असल्याचे समोर आले.
त्यानंतर पोलिसांनी नवीन मोंढा परिसरातील हॉटेल बकासुर, बायपास रोड येथून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडील शाईन मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ९० हजार रुपये किमतीची ही मोटारसायकल जप्त केली.
या मोटारसायकल चोरीप्रकरणी जाफराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अधिक चौकशी केली असता, अजय टेकाळे याने ही दुचाकी एका विधिसंघर्षग्रस्त बालकाकडून खरेदी केल्याचे सांगितले. या पल्सर मोटारसायकल चोरीप्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दोन्ही मोटारसायकली जप्त करून विधिसंघर्षग्रस्त बालक व आरोपी अजय टेकाळे यांना पुढील कारवाईसाठी जाफराबाद पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी तसेच भोकरदन उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या पथकाने केली.