Jalna Illegal Weapons Crackdown Pudhari
जालना

Jalna Crime | आन्वापाडा येथे अवैध तलवार बाळगणारा तरुण जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; १ हजार ५०० रुपयांची तलवार जप्त

पुढारी वृत्तसेवा

Jalna Illegal Weapons Crackdown

आन्वा : जालना जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. भोकरदन तालुक्यातील आन्वापाडा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत अवैध तलवार बाळगल्याप्रकरणी २५ वर्षीय तरुणाला अटक केली. त्याच्याकडून १ हजार ५०० रुपये किमतीची तलवार जप्त करण्यात आली आहे.

अभिषेक कृष्णा राऊत (वय २५, रा. आन्वापाडा, भैरोबावाडी, ता. भोकरदन, जि. जालना) असे कारवाई करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

जालना जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तेजबीरसिंह संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांचा शोध सुरू केला होता.

दरम्यान, २३ ऑक्टोबर रोजी गस्त आणि शोधमोहीम सुरू असताना अभिषेक राऊत याच्याकडे तलवार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा शोध घेतला. चौकशीदरम्यान तलवार आपल्या घरात असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी आन्वापाडा येथील भैरोबावाडी परिसरातून १ हजार ५०० रुपये किमतीची तलवार जप्त केली.

या प्रकरणी संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन पारध पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजबीरसिंह संधू आणि अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, पोलीस कॉन्स्टेबल विजय डिक्कर आणि योगेश सहाने यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT