मृत मुलगी सोनाली मोहिते व आई कावेरी मोहिते 
जालना

Jalna News | पंढरपूरवाडी येथे कपडे धुताना खाणीमध्ये पडून माय लेकीचा मृत्यू

खदानी वर कपडे धुण्यासाठी गेल्या असताना घडली दुर्घटना, हसनाबाद पोलिसांत नोंद

पुढारी वृत्तसेवा

भोकरदनः तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाणे हद्दीतील पंढरपूर वाडी येथे खदानी वर कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीस वर्षीय विवाहित महिला व तिची बारा वर्षीय मुलगी या दोघींचा खदानी मधील पाण्यात बुडून मृत्यू झाला. सदरील घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे व त्यांचे सहकारी यांनी तातडीने घटनास्थळ गाठले मात्र ते पोहोचेपर्यंत सदरील महिला व तिची मुलगी दोघेही मरण पावल्या होत्या.

शुक्रवार 20 मार्च रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान पंढरपूर वाडी येथील विवाहिता कावेरी दशरथ मोहिते वय 30 वर्षे व तिची मुलगी सोनाली दशरथ मोहिते वय बारा वर्षे या दोघी कपडे धुण्यासाठी गावालगत असलेल्या खादानी वर गेल्या होत्या.

कावेरी मोहिते या कपडे धुत असताना त्यांची मुलगी सोनाली ही पाय घसरून खदानीच्या पाण्यामध्ये पडली तिला वाचविण्यासाठी कावेरी मोहिते ह्या खदानकडे गेल्या असता मुलीला वाचण्याच्या प्रयत्नामध्ये त्याही खदानीच्या पाण्यात पडल्या व दोघीही जणी खोल पाण्यामध्ये बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तायडे व कर्मचारी निलेश खराट, अविनाश मांटे, भरत चौधरी यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली मात्र त्यापूर्वीच त्या दोघीजणी मृत पावल्या होत्या. पोलिसांनी त्यांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून त्यांना ग्रामीण रुग्णालय भोकरदन येथे आणून त्यांचे शवविच्छेदन केले. त्यानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकाकडे सुपूर्त करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT