Jalna Temperature jalna photo
जालना

Jalna Temperature : उन्हाचा तडाखा वाढला;पारा ३५ अंशांवर पोहोचणार!

आगामी आठवड्यात ऑक्टोबर हिटचा जोर अधिक वाढणार

पुढारी वृत्तसेवा

जालना : परतीच्या वाटेवर असलेल्या मान्सूनने विश्रांती घेतल्यानंतर जालना शहर आणि जिल्ह्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढू लागला आहे. आगामी आठवड्यात ऑक्टोबर हिटचा जोर अधिक वाढणार असून, कमाल तापमान तब्बल ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

पुढील आठवडाभर जिल्ह्यात आकाश निरभ्र आणि स्वच्छ राहणार असून कडक ऊन पडणार आहे. बुधवारी (दि.१४) आणि गुरुवारी (दि.१५) तापमान ३४° से. राहण्याचा अंदाज असून रात्रीचे तापमान १९° ते २०° से. दरम्यान राहील. तर शुक्रवारी (दि.१६) उन्हाचा तडाखा सर्वाधिक असणार असून पारा ३५° से. वर पोहोचण्याची शक्यता आहे.

शनिवार (दि.१७) ते मंगळवार (दि.२०) दरम्यानही सूर्यप्रकाश प्रखर राहील आणि तापमान ३१° ते ३४° सेल्सिअसच्या आसपास राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT