Jalna News : जिल्हा बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड file photo
जालना

Jalna News : जिल्हा बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

बँकेचे नूतन अध्यक्ष राहुल लोणीकर यांनी कर्मचाऱ्यांना एक मोठी आणि ऐतिहासिक दिवाळी भेट दिली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Jalna News: Sweet Diwali of District Bank employees

तळणी, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदाची आणि उत्साहाची ठरणार आहे. बँकेचे नूतन अध्यक्ष राहुल लोणीकर यांनी कर्मचाऱ्यांना एक मोठी आणि ऐतिहासिक दिवाळी भेट दिली आहे.

गेल्या २० वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात पहिल्यांदाच जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना तब्बल २७ दिवसांचा म्हणजेच जवळपास पूर्ण एक महिन्याचा पगार बोनस म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या अभूतपूर्व निर्णयामुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण असून, त्यांची दिवाळी यंदा अत्यंत थाटात साजरी होणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अनेक वर्षांपासून सेवा देणारे आणि निवृत्तीनंतरही बँकेच्या प्रगतीसाठी कार्यरत असणारे असंख्य कर्मचारी आहेत. या सर्व घटकांचा विचार करून नूतन जिल्हाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी हा धाडसी आणि कौतुकास्पद निर्णय घेतला.

जवळपास महिनाभराचा अतिरिक्त पगार हातात पडणार असल्याने, कर्मचाऱ्यांनी राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाचे जाहीर आभार मानले आहेत. अध्यक्षांच्या या सकारात्मक निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा बँकेप्रती असणारा उत्साह अधिक वाढला आहे. एकीकडे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT