Jalna News : शेतकऱ्यांची टँकरच्या पाण्यावर मिरची जगविण्यासाठी धडपड file photo
जालना

Jalna News : शेतकऱ्यांची टँकरच्या पाण्यावर मिरची जगविण्यासाठी धडपड

एका टँकरसाठी मोजावे लागतात दीड हजार रुपये

पुढारी वृत्तसेवा

Jalna News: Farmers struggle to keep chilli crops alive using tanker water

पिंपळगाव रेणुकाई पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात पाऊस लांबल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. ऐन उन्हाच्या झळांनी शेतातील उभी पिके करपत आहेत. पिंपळगाव रेणुकाई परिसरात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उन्हातान्हात मिरचीची लागवड केली आहे. पावसाळा लांबल्यामने विहिरी व बोअर कोरडे पडल्यानने आता शेतकरी पाण्याचे टँकर विकत घेउन मिरची वाचविण्याची धडपड करतांना दिसत आहे.

पिंपळगाव रेणुकाई परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी बागायती करण्यात येते. शेतकरी मिरचीसह कपाशी व इतर पिके पाऊस पडण्यापूर्वी मोठा खर्च करून लागवड करतात. त्यातून त्यांना चांगले पैसे मिळतात. पिंपळगाव रेणुकाई येथील रोहित देशमुख या शेतकऱ्याने दोन एकर क्षेत्रावर मिरचीची लागवड केली आहे. त्यासाठी मल्चींगसह मिरचीच्या रोपांवर मोठा खर्च केला आहे. पाऊस लांबल्याने विहिरींनी तळ गाठल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

पाणी कमी पडू लागल्याने मिरचीची रोपे माना टाकू लागली आहेत. मिरचीची रोपे वाचवण्यासाठी त्यांना एका टँकरला पंधराशे रुपये मोजावे लागत आहेत. कोरड्या विहिरीत टँकरमधील पाणी सोडून विहिरीतील पाणी पाईपलाईनद्वारे मिरचीला ठिबक सिंचनव्दोरे देण्यात येत आहे.

पाऊस लांबल्याने महिन्याला त्यांना अठरा हजारांचा भुर्दंड पडत आहे. अशीच परिस्स्थिती परिसरातील शेतकऱ्यांची आहे. हाता तोंडाशी आलेली मिरची पाण्याविना डोळ्यादेखत जळत असल्योने कर्ज काढून मिरची वाचविण्याचा प्रयत्न शेतकरी करताना दिसत आहे. पाऊस अधिक काळ लांबल्याास मिरचीच्या पिकासाठी किती दिवस पाणी विकत घेणार असा सवाल देशमुख यांनी केला. शासनाने शेतकऱ्यांना मिरचीचे पीक वाचविण्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

खरीप हंगाम लाबल्याने शेतकरी अडचणीत असतानाच पिंपळगाव रेणुकाई परिसरातील इतर भाजीपाला पिकांचीही अशीच अवस्था झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे.

मिरची लागवड केली मात्र विहिरींना तळ गाठला आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणी टाकण्यात येत आहे. टँकरने टाकलेले पाणी जमिनीमध्ये जिरत आहे. मिरची वाचविण्यासाठी होणाऱ्या खर्चामुळे कर्जाचा डोंगर वाढत आहे. धरल तर चावत अन सोडल तर पळत या परिस्थतीत शेतकरी सापडला आहे.
- रोहित देशमुख, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT