जालना : जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जनावरांमधे लंम्पी आजाराची लागण होण्याचे प्रमाण वाढले होते. मात्र लसीकरण व इतर उपाययोजनां मुळे त्यात घट होताना दिसत आहे. लम्पीमुळे आजपर्यंत ५८ जनावरांचा मृत्यू झाला असून ९८ जनावरे बाधित आहेत.
जालना जिल्ह्यात ४ लाख २१ हजार ९७५ गाय वर्ग जनावरे आहेत लंम्पी चर्मरोग हा फक्त गाय वर्ग जनावरांना होत असल्यामुळे जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यात सध्या ९८ लम्पी रोगग्रस्त गायी बाधीत आहेत. त्यांच्यावर नियमित उपचार सुरू आहेत. पशुपालकांनी लंम्पी रोगाचे लक्षणे दिसल्यास तातडीने नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा व जनावरांवर उपचार करून घ्यावेत.
उपचार करण्यासाठी दिरंगाई झाली तर जनावर दगावण्याची शक्यता वाढते त्यामुळे अंगावरील गाठी दिसल्यास तातडीने जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे संपर्क करावा. लंम्पी रोगाचे सर्व उपचार हा मोफत सुरू असून याबाबत पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून नियमित आढावा घेण्यात येत असल्याची माहिती पशू संवर्धन उपसंचालक डॉ चौधरी यांनी दिली. लम्पी हा जनावरांमधील विषाणूजन्य त्वचा आजार आहे. याचा प्रादुर्भाव गायी, म्हशींमध्ये आढळून येतो.
जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद व बदनापुर या तीन तालुक्यातील जनावरांमधे लंम्पी होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसुन येत आहे. या पार्श्वभुमीवर पशुविभागाकडुन लसीकरणासह जनजागृती व उपायोजना केल्या जात आहे.डॉ. प्रशांत चौधरी, पशू संवर्धन उपसंचालक
मात्र शेळ्यांमध्ये आढळत नाही. याची तीव्रता संकरित गायींमध्ये अधिक प्रमाणात असते. सर्व वयोगटातील जनावरांमध्ये प्रादुर्भाव आढळतो. प्रौढ जनावरांच्या तुलनेत लहान वासरांमध्ये लंम्प्पीचे प्रमाण अधिक आहे. या आजारामध्ये मरण्याचे प्रमाण कमी असले तरीही आर्थिकदृष्ट्या जास्त नुकसान होते. कारण, जनावरांच्या दूध उत्पादनात घट येते. जनावरे अशक्त होतात. काही वेळा गर्भपात होण्याची शक्यतादेखील असते. जनावराची त्वचा कायमस्वरूपी खराब होऊन जनावर विकृत दिसते. त्यामुळे जनावरांचे बाजारमूल्य घटते.