रवींद्र कारके
अंबड : येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या विभागाकडून निराधार योजनेतील शासनाच्या बदललेल्या आदेशानुसार लाभार्थ्यांना बँकेची ई-केवायसी, आधार कार्ड अपडेट व अन्य तांत्रिक अडचणीमुळे हैराण झाले आहे. या योजनेच्या लाभापासून ३ हजार ८९९ लाभार्थी वंचित आहेत.
तालुक्यात संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजनेखालील अर्थसाह्य योजनेतील एकूण पात्र लाभार्थी २२ हजार ३५४ इतके असून यापूर्वी सर्वांना अनुदान त्यांच्या खात्यावर वाटप होत होते. मात्र सद्यस्थितीत २२३५४ पैकी १८४५४ लाभार्थ्यांना लाभ दिला जात असून ३८९९ लाभार्थी हे सदर लाभापासून वंचित आहेत.
दरम्यान ऑनलाइन पद्धतीमध्ये आधार अपडेट, बँकेची ई-केवायसी व इतर तांत्रिक अडचणीमुळे गेल्या तीन ते चार महिन्यांपूर्वीपासून वयोवृद्ध, विधवा, अपंग, भूमिहीन निराधार हे इकडून तिकडे येरझारा मारून हैराण झाले असून त्यांना आधार देणारा कोणीही वाली नाही नसल्याचे काही वयोवृद्ध निराधारांकडून सांगण्यात येत आहे. तर काहींचे आधार कार्ड, बँक ई-केवायसी अपडेट झाली असली तरीही सदरील निराधारांचा पगार त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. तर काहींचे अपडेट झाल्यानंतर त्यांची मागील रेगुलर मधील थकबाकी पगार न पाठवता इथून पुढचे पगार मार्च महिन्यापर्यंत मिळणार मिळेल असे सांगण्यात येते. ज्या लाभार्थ्यांना चालता-बोलता येत नाही. तसेच ज्यांना कुणाचाही आधार नाही जे लाभार्थी खरे आहेत. त्यांच्याच पगारी काही तांत्रिक अडचणी व शासनाने घालून दिलेल्या टेक्निकल नियमांचे अपडेटमुळे आज बंद असल्याचे पाहावयास मिळत आहे.
याकडे लोकप्रतिनिधी व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष देऊन या निराधारांना आधार देण्यासाठी तहसील कार्यालयात संबंधित बँकेचे अधिकारी, आधार केंद्राचे कर्मचारी, तांत्रिक शाखेचे कर्मचारी व संबंधित ई महा सेवा केंद्राचे चालक व मालक यांचा एकत्रितरीत्या मिलाप करून कॅम्प घेऊन सदरील टेक्निकल केमिकल बाबींचा निपटारा करून निराधारांना आधार द्यावा अशी मागणी केली जात आहे.
लाभापासून वंचित असलेले ३८९९ लोकांना अद्याप संजय गांधी निराधार योजनेच्या विभागाकडून कोणतीही लेखी पत्र देण्यात आले नाही. याशिवाय आज पर्यंत ज्या कोणी नवीन लाभार्थ्यांनी मागील काही वर्षांपासून ते आज पर्यंत लाभ मिळवण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत त्यांच्या कागदपत्राच्या त्रुटीचे अथवा अपात्रतेचे कारणे माहिती होण्यासाठी एकाही लाभार्थ्याला पत्रव्यवहार केलेले नसल्याने संबंधित लाभार्थी इकडून तिकडे चक्रा मारून परेशान झाले आहेत.
"अर्ज दाखल केलेल्या पात्र अथवा अपात्र लाभार्थ्यांना पूर्वीपासूनच हे कार्यालय पत्रव्यवहार करीत नसून मीटिंगमध्ये पात्र झालेल्या लाभार्थ्यांची यादी तहसील कार्यालयात लावली जाते."- संजय झोरे, नायब तहसीलदार, अंबड