भोकरदन : दिनांक 27 रोजी तडेगाव येथे शेत रस्त्याच्या कारणावरून काका पुतण्या मध्ये लोखंडी गज कुऱ्हाडीचा दांडा व काठीने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या काका रामचंद्र मगनसिंग काकरवाल वय 47 यांचा दिनांक ८ रोजी सकाळी जालना येथे खाजगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी गंभीर जखमी असलेल्या त्यावेळी फिर्यादी च्या तक्रारीवरून पाच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. रामचंद्र काकरवाल यांचा मृत्यू झाल्याने यात खुनाचा चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यापैकी एका आरोपीला त्याच वेळी अटक करण्यात आली होती तर अन्य एकाला आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 27 मे रोजी तडेगाव येथे दुपारी दीड वाजे दरम्यान जुन्या भांडणाच्या कारणावरून रामचंद्र काकरवाल याला त्यांचा पुतण्या राहुल छगन काकरवाल प्रवीण काकरवाल, विठ्ठल सिंघल, किसन सिंघल, हिम्मत सिंघल, अशा पाच जणांनी मिळूनलोखंडी गज दुसऱ्याने चाकू व लाठी व काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते.
त्यानंतर यातील गंभीर जखमी असलेले रामचंद्र काकडवाल यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात पाच जनाविरुद्ध तक्रार दिली होती रामचंद्र काकरवाडी यांच्यावर प्रथम उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात पाठविण्यात आले होते तेथे त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दिनांक आठ रोजी सकाळी सहा वाजता त्यांचा मृत्यू झाला आहे .
मृत्यूची बातमी कळताच गावात व नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला त्यांची भाऊ व इतरांनी पोलिसांवर ही हलगर्जीपणाचा आरोप करीत पोलिसांनी फक्त एकच आरोपी अटक करून बाकीच्या आरोपींना लवकर ताब्यात घेतले नाही इतर आरोपींना बाहेर राहण्यासाठी पोलिसांनी आर्थिक देवाणघेवाण केल्याचं गंभीर आरोप केला आहे. उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी करीत रामचंद्र काकरवाल यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्याचे नकार दिला काकरवाल यांच्या मृतदेहाचे जालना येथील जिल्हा रुग्णालयात शिवविच्छेदन करण्यात आले आहे मात्र नातेवाईक आणि पोलिसांमध्ये ताळमेळ न बसल्याने मृतदेह बराच वेळ ताब्यात घेण्यात आला नव्हता.
याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात दिनांक 27 रोजी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. राहुल काकडवाल व छगन काकरवाल या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे अन्य तीन आरोपी सध्या फरार आहेत. या प्रकरणाचा तपास जमादार सोमनाथ मंडलिक हे करीत आहे.