जालना मनपाची 6 मार्चला विशेष सभा pudhari photo
जालना

Jalna Municipal Corporation : जालना मनपाची 6 मार्चला विशेष सभा

स्वीकृत सदस्य निवड व समित्यांवर होणार शिक्कामोर्तब

पुढारी वृत्तसेवा

जालना : जालना शहर महानगरपालिका यांच्या वतीने शुक्रवार, दि. 6 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा महानगरपालिका प्रशासकीय इमारतीतील नवीन सभागृहात पार पडणार असून, महापौर वंदना मगरे यांच्या मान्यतेने नगरसचिव सुप्रिया चव्हाण यांनी सभेची अधिकृत सूचना जारी केली आहे.

या सभेत जालना शहरासंदर्भातील विविध विकासकामांसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. शहरातील महत्त्वाच्या बाबींवर महापालिकेच्यावतीने निर्णय घेतले जाणार आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 2012 नुसार 6 स्वीकृत सदस्यांच्या नामनिर्देशनाचा निर्णय होणार असून, याशिवाय स्थायी समितीच्या 16 सदस्यांची नियुक्तीही करण्यात येणार आहे.

तसेच महिला व बाल कल्याण समितीसह विविध विशेष आणि प्रभाग समित्यांची स्थापना करण्यावरही शिक्कामोर्तब होणार आहे. यासोबतच 9 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या विशेष सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात येणार आहे.

दरम्यान, स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून 26 व 27 फेब्रुवारी रोजी अर्ज वितरण, 2 मार्च रोजी अर्ज स्वीकारणे आणि 4 मार्च रोजी छाननी प्रक्रिया पार पडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT