Jalna News : मोबाईल शॉपी फोडून साहित्य लंपास file photo
जालना

Jalna News : मोबाईल शॉपी फोडून साहित्य लंपास

अंबड शहरातील जालना-बीड रोडवरील घटना

पुढारी वृत्तसेवा

Jalna Mobile shop broken into; merchandise stolen

जालना, पुढारी वृत्तसेवाः अंबड शहरातील बीड रोडवर असलेल्या अमित मोबाईल शॉपी दुकानाचे शटर फोडुन चोरटयांनी हजारो रुपयांचे मोबाईल चोरी केले. इन्सॅटमधे चोरट्यांनी उचकटलेले शटर अंबड शहरातील जालना- बीड महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या लगत असलेल्या अमित मोबाईल शॉपी हे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांच्या चोरी केल्याची घटना घडली.

शहरातील जैस्वाल बंधू यांचे अंबड येथे अमित मोबाईल हे दुकान आहे. शुक्रवारी (ता.१८) रोजी पहाटे चार वाजेच्या दरम्यानया दुकानाचे शटर गॅस कटरने उचकटुन अज्ञात चोरट्यानी दुकानात प्रवेश करत लाखो रुपयांच्या विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल चोरुन नेले. प्राथमीक अंदाजानुसार जवळपास तीस ते पस्तीस लाख रुपयांचे मोबाईल चोरीस नेले असावे. पोलिसांच्या वतीने सांगण्यात येत आहे.

श्वान पथक दाखल

अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी तत्काळ भेट देऊन माहिती जाणून घेतली. अज्ञात चोरट्याचा मागमूस शोधण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. रात्री उशिरा पर्यंत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT