जालना ः जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरसह पोलिस अधिकारी, कर्मचारी.  pudhari photo
जालना

Jalna illegal sand transport : पाठलाग करून ट्रॅक्टर पकडला; मुद्देमाल जप्त

मौजपुरी पोलिसांची धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

जालना : जालना जिल्ह्यात वाढत चाललेल्या अवैध वाळू व गौण खनिज वाहतुकीविरोधात मौजपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे 5 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सहायक पोलिस निरीक्षक अतुल पाटील यांच्या सूचनेनुसार 18 एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार दुधना नदी पात्रातील घेटूळी शिवारात ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे समोर आले होते. यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

दरम्यान, पोलिसांना पाहताच लाल रंगाचे क्रमांक नसलेले एक ट्रॅक्टर पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी पोलिसांनी जालना-मंठा मार्गावर बाबुलतारा गावाजवळ पाठलाग करून संबंधित ट्रॅक्टर पकडण्यात यश मिळवले.

ट्रॅक्टर चालक संदीप रामप्रसाद शेळके (रा. पाहेगाव, ता. जि. जालना) याच्याकडे वाळू वाहतुकीसंदर्भातील रॉयल्टी पावतीची मागणी केली असता ती सादर करता आली नाही. त्यामुळे ट्रॅक्टर व ट्रॉलीचा पंचनामा करून तो मौजपुरी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. या कारवाईत ट्रॅक्टरसह एकूण 5 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, पोलीस हवालदार दादासाहेब हरणे, नितीन खरात तसेच पोलीस अंमलदार प्रदीप पाचरणे, प्रशांत म्हस्के, कैलास शिवणकर, सदाशिव खैरे, धोंडीराम वाघमारे यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT