जालना: मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाबाबत आज (दि.21) बैठकीचं आयोजन केलं होतं. बैठक सुरू होताच आग्या मोहोळाने बैठकीसाठी आलेल्या लोकांवर हल्ला चढवला. यामुळे काही वेळ लोकांची पळापळ झाली.
अंतरवाली मराठा समाजाची रविवार ( दि.21) बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत सहभागी लोकांवर अचानक मधमाशांनी हल्ला चढवला. बैठकीसाठी आलेल्या काही जणांना मधमाशांनी चावा व दंश केल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवले.
बैठकीच्या ठिकाणावरून कार्यकर्त्यांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली तसेच काहींनी अंगावर बागायती रुमाल घेतल्याचेही दिसून आले.बैठकीच्या ठिकाणी मधमाशा आल्याने मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मराठा समन्वयकाच्या बैठकीला सुरुवात केली.