jalna Mahayuti Ambad Satish Chavan victory
जालना, पुढारी वृत्तसेवाः मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे (भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना) अधिकृत उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ अंबड येथे पदवीधर मतदारांची संवाद बैठक सोमवार, दि. १२ रोजी उत्साहात पार पडली. या वेळी महायुतीच्या नेत्यांनी चव्हाण यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन रेकॉर्ड ब्रेक फरकाने निवडून आणण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त केला.
या बैठकीस आमदार नारायण कुचे, शिक्षक आमदार विक्रम काळे, माजी आमदार शिवाजीराव चौथे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्यासह संस्थाचालक डॉ. राहुल डोंगरे, उपनगराध्यक्ष विश्वजीत खरात, माजी जि. प. सदस्य रवींद्र तौर, युवा सेनेचे जालना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब इंगळे, शिवसेना युवा नेते संतोष जेधे आणि भाजप माजी तालुकाध्यक्ष कृष्णा जिगे उपस्थित होते.
सतीश चव्हाण यांनी शैक्षणिक, आरोग्य, कृषी, क्रीडा व जुनी पेन्शन योजनेसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. असल्याचे आमदार विक्रम काळे व नारायण कुचे यांनी सांगितले. तर शिवाजीराव चौथे व अरविंद चव्हाण यांनी, वंचित विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवले आहे, असे सांगितले.
या वेळी पालिकेचे सभापती राम लांडे, अॅड. रवींद्र कारके, प्रा. सुखदेव मांटे, विनायक चोथे, प्रदीप पवार, नंदकिशोर पुंड, नगरसेवक गंगाधर वराडे, सौरभ कुलकर्णी, सुरेश खरात, संभाजी गुढे, रिपाइंचे सुरेख खरात, संतोष ठेंगळे, सतीश ढवळे, अॅड. खटके, डॉ. राजेंद्र ठोसर, सरपंच साईनाथ उकर्डे, शहराध्यक्ष नंदकिशोर पुंड आदी उपस्थित होते.