Mahavitaran News : मीटरमधील फेरफार थेट महावितरणला कळणार! File Photo
जालना

Jalna Mahavitaran News : मीटरमधील फेरफार थेट महावितरणला कळणार!

वीज चोरीची २४ प्रकरणे उघडकीस तीन जणांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

जालना : महावितरणतर्फे अत्याधुनिक असे टीओडी (टाइम ऑफ डे) मीटर बसवले जात असल्याने ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती दर तासानुसार (रिअल टाइम) उपलब्ध होत आहे. त्यामुळे ग्राहकांचे वीज वापरावर व वीजबिलावर नियंत्रण राहील. तसेच या मीटरमध्ये ग्राहकाने फेरफार केल्यास त्याची माहिती थेट महावितरणला ऑनलाइन कळत आहे. टीओडी मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याची २४ प्रकरणे जालन्यात नुकतीच उघडकीस आली आहेत. तीन ग्राहकांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, इतर ग्राहकांवरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे वीजचोरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

जालना जिल्ह्यात सध्या नवीन वीज जोडणी व सौरऊर्जा ग्राहकांसाठी टीओडी मीटर बसवण्यात येत आहेत. जुने मीटर बदलून त्या जागीही टीओडी मीटर बसवले जात आहेत. टीओडी मीटर जालना जिल्ह्यात सध्या नवीन वीज जोडणी व सौरऊर्जा ग्राहकांसाठी टीओडी मीटर बसवण्यात येत आहेत. जुने मीटर बदलून त्या जागीही टीओडी मीटर बसवले जात आहेत. टीओडी मीटर मध्ये कम्युनिकेशन पोर्ट असून ते महावितरणच्या सव्र्व्हरला जोडलेले असल्याने मीटरचा रिअल टाइम डाटा उपलब्ध होतो. मीटर नादुरुस्त झाल्याची माहिती त्वरित मिळते.

या मीटरचे रीडिंग ऑटोमॅटिक होणार आहे. यात मानवी हस्तक्षेपाला कोणताही वाव नाही. त्यामुळे ग्राहकांना अचूक व वेळेवर बिले मिळणार आहेत. वीज वापराबरोबरच मीटरमध्ये कुणी फेरफार केला तर त्याची थेट माहिती त्याचक्षणी महावितरणला मिळत आहे. अशा ग्राहकांची प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर वीजचोरी पकडली जात आहे. जालना शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत महावितरणने गेल्या काही दिवसांत केलेल्या तपासणीत मीटर मध्ये वीजचोरी केल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत

या ग्राहकांना काही महिन्यांपूर्वी टीओडी मीटर बसवण्यात आले होते. पण त्यांनी मीटरमध्ये काहीतरी फेरफार केल्याची माहिती महावितरणला लगेच ऑनलाइन उपलब्ध झाली. या ग्राहकांनी वीजचोरी केल्याचे प्रत्यक्ष तपासणीत आढळून आले. या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तसेच त्यांच्यावर विद्युत कायद्याच्या विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी तिघांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. इतर ग्राहकांवरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महावितरणच्या या कारवाईने वीजच टीओडी चोरांचे धाबे दणाणले आहे.

हे अत्याधुनिक मीटर असल्याने प्रत्येक युनिटची रिअल टाइम माहिती ग्राहकास मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वीज वापरानुसार रीडिंग येते याची खात्री ग्राहकाला करता येणार आहे. मीटरसाठी ग्राहकांवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. ही केंद्र सरकारची योजना असल्याने मीटर बसवण्यासाठी केंद्राने निधी दिला आहे. तसेच घरगुती ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळ-`तील वीज वापरास सवलतही मिळणार आहे.

तथापि, टीओडी मीटरचे इतके सारे फायदे असतानाही काही ग्राहक वीजचोरी करताना आढळले आहेत. अत्याधुनिक प्रणालीमुळे मीटरमधील फेरफार महावितरणला तत्काळ माहीत होत आहे. वीजचोरी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून या गुन्ह्यात तीन वर्षे कारावास किंवा दंड अथवा या दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. नागरिकांनी ही बाब लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारे विजेचा चोरटा किंवा अनधिकृत वापर कटाक्षाने टाळावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

वीज चोरी करणारे 24 जण पकडले

जालना शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत महावितरणने गेल्या काही दिवसांत केलेल्या तपासणीत टीओडी मीटरमध्ये वीजचोरी केल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. या ग्राहकांना काही महिन्यांपूर्वी टीओडी मीटर बसवण्यात आले होते.

पण त्यांनी मीटरमध्ये काहीतरी फेरफार केल्याची माहिती महावितरणला लगेच ऑनलाइन उपलब्ध झाली. २४ ग्राहकांनी वीजचोरी केल्याचे प्रत्यक्ष तपासणीत आढळून आले. या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तसेच त्यांच्यावर विद्युत कायद्याच्या विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी तिघांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT