Indian Railways file photo
जालना

जालना-जळगाव रेल्वे मार्ग, कारणे दाखवा नोटीस

छत्रपती संभाजीनगर खंडपिठाने दिली नोटीस

पुढारी वृत्तसेवा

Jalna-Jalgaon Railway Line, Show-Cause Notice

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : जालना- जळगाव प्रस्तावित रेल्वे मार्ग प्रकरणी भोकरदन तालुकयातील जोमाळा येथील शेतकरी मकरंद देशपांडे व इतर शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने केंद्र राज्य सरकार व रेल्वे विभागास याचिकेवर उत्तर देण्यासाठी नोटिस दिली आहे.

या याचिकेत याचिकाकर्त्यांतर्फे अॅड गौरव देशपांडे यांनी बाजू मांडून प्रस्तावित रेल्वे मार्गाला आव्हान दिले आहे. याचिकाकर्त्यां नी याचिकेत सरकार तर्फे या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप केला आहे. तसेच नियमानुसार दोन तीन पर्यायी मार्गाचा अभ्यास करुन मगच एका योग्य मार्गाचा पर्याय निवडने अवश्यक आहे.

परंतु आत्ताचा प्रस्तावित मार्ग निवडण्या आधी इतर पर्यायी मार्गाचा सर्वे केला होता का ? आणि केला असेल तर हा मार्ग त्या पर्याया पेक्षा योग्य कसा याचे कुठलेही उत्तर सरकार किंवा रेल्वे खाते देवू शकले नाही. या प्रस्तावित मार्गावर जालना ते जळगाव पर्यंत जवळपास ६ ते ७ ठिकाणी महामार्ग रेल्वे क्रॉसिंग होणार असून त्या मुळे या मार्गाचा अतिरिक्त खर्च ५०० कोटी पेक्षा जास्त होणार आहे.

तसेच भोकरदन शहरा जवळ ३ किलोमीटरच्या अंतरावर दोन ठिकाणी महामार्ग क्रॉसिंग होणार आहे. ज्या मुळे महामार्ग वरील वाहतुकीचा खोळंबा होऊन नागरिकांना त्याचा त्रास होणार आहे.

या बरोबरच जमीन अधिग्रहण प्रकरणी सुद्धा पारदर्शकता नसल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना काहीही न कळवता जमीन मोजणी करून राजपत्रात क्षेत्र टाकण्यात आले असल्याचे म्हणने आहे.

१३ ला सुनावणी

या संपूर्ण याचिकेवर आपले म्हणणे मांडण्यासाठी उच्च न्यायालयाने प्रतिवादींना नोटिस जारी केल्या आहेत. पुढील सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली असल्याची माहिती याचिकाकर्ते मकरंद देशपांडे व त्यांचे वकील अॅड गौरव देशपांडे यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT