जालना

Jalna crime | बदनापूरच्या देवगाव फाटा परिसरात अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ

या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास पोलीस करत आहेत

पुढारी वृत्तसेवा

बदनापूर : शहरालगत असलेल्या देवगाव फाटा परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या या परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एका इसमाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह दिसून आला असता. याची माहिती बदनापूर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाचा पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सदर मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून, मृत्यूचे नेमके कारण काय याबाबतही स्पष्टता आलेली नसली तरी, हा घातपात असल्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी याच परिसरात मृतदेह आढळून आला आहे. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT