Jalna Crime 
जालना

Jalna Crime | भोकरदन शहरात वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या पती - पत्नीवर पोलीसांची कारवाई!

शहरातील म्हाडा वसाहत मध्ये सुरू असलेल्या कुंटण खाण्यावर छापा

पुढारी वृत्तसेवा

भोकरदन : भोकरदन शहरातील म्हाडा वसाहत मध्ये सुरू असलेल्या कुंटण खाण्यावर भोकरदन पोलिसांनी शनिवार 23 मे रोजी अचानकपणे छापा मारून वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या पती-पत्नी एका महिलेला ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई केली.

शनिवार 23 मे रोजी दुपारी 12:00 वाजेच्या सुमारास पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी किरण बिडवे यांना भोकरदन शहरातील म्हाडा कॉलनी येथील गजानन मंदीराजवळ असलेल्या एका टिनपत्राचे शेड मध्ये पती व पत्नी हे बाहेर जिल्हयातील महीलांना बोलावुन त्यांच्याकडुन वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याची खात्रीलायक बातमी प्राप्त झाली.

सदर माहीती ही पोलीस अधीक्षक जालना, अपर पोलीस अधीक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी भोकरदन यांना देऊन त्यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पोलीस उपनिरीक्षक . पवन राजपुत, पोलीस कर्मचारी प्रशांत उबाळे, .शिवाजी जाधव, . संदीप भुतेकर, . किशोर मोरे, .सिमा देठे, जयश्री कुहीरे यांनी म्हाडा कॉलनी येथील ज्ञानेश्वर विनायक वाघ यांच्या मालकीच्या जागेमध्ये छापा मारला.

गणपत रामधीन सेठी वय 54 वर्ष , गिंताजली गणपत सेठी वय 51 वर्ष रा. राजुर ता. भोकरदन जि.जालना हे बाहेर जिल्हयातुन महीलाना आणुन आर्थीक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करत असल्याचे मिळुन आल्याने पिडीत महीलासह रोख रक्कम 35,680 रुपयाचा मुद्येमाल मिळुन आला आहे. त्‍यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर पती व पत्नीवर यापुर्वी सुध्दा पोलीस ठाणे हसनाबाद येथे गुन्हा दाखल आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक तेंघबिर सिंह संधु, अपर पोलीस अधिक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी . डॉ नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक . किरण बिडवे, पोलीस उपनिरीक्षक पवन राजपुत, चालक चव्हाण, पो.अ.प्रशात उबाळे, शिवाजी जाधव, किशोर मोरे, संदीप भुतेकर, सिमा देठे, जयश्री कुहीरे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक . भाऊसाहेब सहाने, पोलीस अंमलदार इंदल बमनावत करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT