जालना

jalana crime | विना नंबरप्लेट धावणाऱ्या १० हायवांवर कारवाई

६१ हजारांचा दंड वसूल; अवैध वाळू वाहतूक

पुढारी वृत्तसेवा

मंठा : मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर अखेर प्रशासनाने कडक पाऊल उचलत धडक कारवाई केली. विना नंबर प्लेट वाळू वाहतूक करणाऱ्या १० हायवा वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, संबंधितांकडून एकूण ६१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मंठा शहरासह प्रमुख मार्गावरून नंबर प्लेट झाकून किंवा पूर्णपणे काढून वाळूची वाहतूक करणारे ट्रक वेगाने धावत असल्याच्या तक्रारी नागरिक व प्रसारमाध्यमांकडून होत होत्या. काही वाहनांचे क्रमांक जाणीवपूर्वक माती अथवा काळ्या ऑईलने झाकल्याचेही उघड झाले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने मंगळवारी विशेष मोहीम राबविली.

उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बालाजी धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत तहसीलदार सुमन मोरे, मोटार वाहन निरीक्षक भीमराज नागरे तसेच चालक आसाराम घुले व भागवत परिसकर यांनी सहभाग घेतला. कारवाई सुरू राहणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी धनवे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT