आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वासह परिसरात यंदा पावसाने सुरुवाती पासूनच ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. जून- जुलैमध्ये दमदार पाऊस न झाल्याने कापसाची वाढ खुंटली, तर जुलै अखेरीस झालेल्या पावसाळी कापसाच्या लागवडीला पुरेसा कालावधी मिळाला नाही. श्रावण महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने पिके सुकली असून उन्हाळी कापसावर लाल्या व मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे एकरी ३० ते ३५ हजार रुपये खर्च करूनही यंदा अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.
शेतकऱ्यांनी जून महिन्यात विहिरीच्या तोडक्या पाण्याच्या आधारावर ठिबक सिंचनाद्वारे मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली. मात्र, पिकांच्या वाढीच्या काळात दमदार पाऊस झाला नाही. त्यात विहिरीही आटल्याने झाडांची वाढ खुंटली. बोंडांची संख्या कमी राहिल्याने एकरी केवळ दोन ते तीन क्विंटल उत्पादन मिळण्याची शक्यता आहे.
पावसाळी कापसाचे उत्पादन मात्र शून्यावर येण्याची स्थिती आहे. पावसाळ्यात पुरेसा पाऊस न झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी झपाटचाने खालावत आहे. परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्याने विहिरींची जलपातळी खोल गेली आहे.
रोगराईमुळे खर्च वाढला रिमझिम पाऊस आणि सतत बदलणाऱ्या हवामानामळे पिकांवर रोगराईंचे प्रमाण वाढले. पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना कीटकनाशके व इतर औषधांवर अतिरिक्त खर्च करावा लागला.
श्रावणात पाऊस नसल्याने बोंडे तयार होण्याच्या अवस्थेतील कापसावर लाल्या व मर रोगाचा प्रादुर्भाव झाला. रब्बी हंगामावरही संकट दरवर्षी डिसेंबर-जानेवारीपर्यत सुरू राहणारा कापसाचा हंगाम यंदा दिवाळीपूर्वीच संपण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर खब्बी हंगामासाठी जमिनीत पुरेसा ओलावा व पाणीसाठा उपलब्ध होईल की नाही, याबाबत शेतकऱ्यांच्या आशाही धूसर झाल्या आहेत.
एकरी ३५ हजारांचा खर्च
नागरटी दोन हजार, रोटर दीड हजार, बियाणे १,८००, लागवड मजुरी ९००, रासायनिक खत १० हजार, वाखरणी तीन हजार, खुरपणी दोन हजार, कीटकनाशक चार हजार इतर खर्च दोन हजार रुपये, असा एकरी सुमारे ३० ते ३५ हजार रुपयांचा खर्च झाला आहे.
- राजेंद्र बावणे, शेतकरी