Jalna News : मक्याच्या गंजी जळून खाक file photo
जालना

Jalna News : मक्याच्या गंजी जळून खाक

दोन ठिकाणी घडल्या घटना

पुढारी वृत्तसेवा

jalna corn ganji fire farmer loss

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शुक्रवारी (१३) रोजी तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी मक्याच्या गंजींना आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, एका प्रकरणात भोकरदन पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बरंजळा लोखंडे येथे गंगा ज्ञानेश भुतेकर यांच्या शेतात काढून ठेवलेल्या मक्याच्या गंजीला आग लागली. या आगीत दोन एकरांतील मक्याचे उत्पादन जळून खाक झाल्याची माहिती आहे. अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या प्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.

रेलगाव येथील दुसऱ्या घटनेत मक्याच्या गंजीला आग लागून ८० ते ८५ क्विंटल मका जळून नुकसान झाले. त्याची अंदाजित किंमत १ लाख ५० हजार रुपये आहे. या प्रकरणी अज्ञाताविरुध्द भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हात दाखल करण्यात आला आहे.

एकाच दिवशी दोन ठिकाणी मक्याच्या गंजींना आग लागल्याच्या घटनांमुळे शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत आहे. प्रशासनाने नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत आणि दोषींना शोधून कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT