जालना : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात प्लास्टिकबंदी करण्यात आलेली आहे. जालना महापालिकेनेदेखील शहरात सर्व प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी घातलेली आहे. बंदी असताना शहरात सर्रासपणे प्लास्टिकचा वापर सुरू आहे. सोमवारी सहायक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करीत साडेसहाशे किलो प्लास्टिीक जप्त करण्यात आले. तसेच दहा हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे.
शहरात प्लास्टिक वापरणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी महापालिकेने सुरुवातील पथकेदेखील तैनात केली होती. प्लास्टिकचा वापर होताना आढळल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या, तर ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांसह इतर प्लास्टिक वस्तूंवर बंदी लागू करण्यात आलेली आहे.
यानंतर सर्व प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी मनपानेही सुरू केली होती. परंतु गेल्या काही वर्षात मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात सर्रासपणे प्लास्टिक वापर वाढल्याचे दिसून होत आहे. शहरातील निघणाऱ्या कचऱ्यात फक्त प्लास्टिक दिसून येत आहे. यामुळे शहरात प्लास्टिीक बंदी नावालाच दिसून येत आहे. यापुढे प्लास्टिक विक्री आढळून आल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.
नियमितपणे तपासणी/पाहणी करण्यात आहे. प्लास्टिक वापरकत्याँवर दंडनीय कार्यवाही करुन गुन्हा नोंद करण्याबाबतची देखील कार्यवाही करण्यात येणार आहे. शहरात ज्याठिकाणी प्लास्टिक वाहतूक, विक्री, वापर व साठा होत असल्यास नागरिकांनी पालिका प्रशासनाला माहिती द्यावी. तसेच बंदी असलेला माल कुणीही विक्री करू नये, असे आवाहन सहायक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांनी केले आहे.