जालनाः उघड्यारील मांस विक्रीचे दुकान सील करताना महानगर पालिकेच्या स्वच्छता विभागाच्यावतीने अधिकारी, कर्मचारी.  pudhari photo
जालना

Jalna meat shops sealed : शहरात १४ दुकाने सील; उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई

महापालिकेच्या स्वच्छता विभागाची मोहीम; मांस विक्रीचे साहित्य जप्त

पुढारी वृत्तसेवा

जालना : शहरातील चंदनझिरा परिसरात उघड्यावर मांसविक्री करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेच्या स्वच्छता विभागाने रविवारी (दि. १३) धडक कारवाई केली. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणारी १४ दुकाने सील करण्यात आली.

स्वच्छता व्यवस्था, सार्वजनिक आरोग्य आणि मांसविक्रीसंदर्भातील नियमांचे पालन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. उघड्यावर मांसविक्री करणाऱ्यांवरही कारवाई करून विक्रीसाठी ठेवण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले.

या कारवाईत सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर, स्वच्छता विभागप्रमुख सुधीर डहाळे, चिकन-मटन विभागप्रमुख मोहम्मद अमजद खान, सहाय्यक मुकेश गायकवाड, सहाय्यक राजेंद्र मिसाळ, रामेश्वर जाधव, प्रभारी मुकादम तुषार लोखंडे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते.

कारवाई सुरूच राहणार

शहरातील उघड्यावर होणारी मांसविक्री तसेच संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेची कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मांसविक्रेत्यांनी नियमांचे पालन करूनच व्यवसाय करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT