Jalna Case of bogus administrative approval, investigation in final stage
जालना, पुढारी वृत्तसेवाः समाजकल्याण विभागाच्या बोगस प्रशासकीय मान्यता प्रकरणावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी. एम. यांनी परखडपणे आपले मत व्यक्त केले. या कामाचा एक रुपयाचाही चेक माझ्या सहीने जाणार नाही, आणि माझ्या कार्यालयातून या प्रमा बाहेर कशा गेल्या, त्या कोणी तयार केल्या, याची चौकशी करुन संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी. एम. यांनी घेतली.
शुक्रवार दि. ३१ रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात श्रीमती मिन्नू पि. ए. यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, समाजकल्याण विभागाच्या बोगस प्रशासकीय मान्यता गहाळ झाल्या होत्या. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांच्याकडे त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार होता.
त्यांनी बोगस प्रशासकीय तयार करणाऱ्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, यावर मान्यता केणतीही कारवाई झाली नाही. हा प्रश्न मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी. एम. यांना विचारला असता त्यांनी या बोगस प्रशासकीय मान्यताची पडताळणी झाली आहे. त्या बोगसच आहे. त्या केलेल्या कामाचा एकही चेक माझ्या सहीचा जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री समृध्द पंचायराज अभियान
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान शासनाच्यावतीने जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. याची सुरूवात १७ सप्टेंबर पासून झाली आहे. या अभियानांतर्गत २० ग्रामपंचायतींची राज्यस्तरावर तपासणी होणार आहे. आठ मुद्यांवर या अभियानात जोर देण्यात आला आहे. शिवाय, दर सोमवारी श्रमदान म्हणून आम्ही जिल्हा परिषद परिसराची स्वच्छता करीत आहोत. दर मंगळवारी तक्रार निवारण दिन साजरा होत आहे. बुधवारी पंचायत समिती स्तरावर तक्रार निवारण दिन राबविण्यात येतो. यातून तक्रारी कमी करायच्या आहेत.
२५६ मुलांचे अर्ज
सुपर ५० उपक्रमासाठी आतापर्यंत २५६ मुलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांची परीक्षा रविवारी होणार आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना जेईई, नीट आदी चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळेल. शिवाय, एनज-ीओंच्या माध्यमातून जिल्ह्यातील १० शाळा मॉडेल बनवायच्या आहेत. त्यासाठी एमओयु केले जाणार आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा, शिक्षकांची क्षमता बांधणी, पायाभूत संसाधन क्षमता वाढीसाठी देखील प्रयत्न केले जाणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प देखील या इमारतीवर राबविण्यात येणार आहे.