Samruddhi Mahamarg Multi Vehicle Collision Pudhari
जालना

Samruddhi Expressway Accident | समृद्धी महामार्गावर भरधाव कंटेनरची १५ ते २० वाहनांना जोरदार धडक; अनेक प्रवासी जखमी

बुलढाणा ते मेहकरदरम्यान अपघात, माजी मंत्री राजेश टोपे यांची जखमींच्या मदतीसाठी तत्परता

पुढारी वृत्तसेवा

Samruddhi Mahamarg Multi Vehicle Collision

जालना : समृद्धी महामार्गावर बुलढाणा ते मेहकरदरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने तब्बल १५ ते २० वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातामुळे महामार्गावर एकच खळबळ उडाली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, याच मार्गावरून प्रवास करत असलेले माजी मंत्री राजेश टोपे यांनी अपघाताचे गांभीर्य लक्षात घेत क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेत सहकार्य केले. तसेच जखमी प्रवाशांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी त्यांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी आवश्यक मदत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT