परतूर; पुढारी वृत्तसेवा : परतुर वाटुर रोडवर कंडारी पाटी जवळ आज (दि. २६) दुपारी अपघात घडला असून ट्रॅक्टरने मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.
या अपघातात कृष्णा शिवदास राठोड (वय 32 रा. शेवली तांडा) हा जागीच ठार झाला तर बळीराम राठोड (वय 32 रा. शेवली तांडा) हा गंभीर जखमी झाला. या जखमीवर येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर संतोष काळे यांनी उपचार करून यास पुढील उपचारार्थ जालना येथे पाठवण्यात आले आहे. दरम्यान या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक विना क्रमांकाची ट्रॉली जागेवर सोडून ट्रॅक्टर घेऊन पसार झाला. परतुर पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.