Crime News  File Photo
जालना

Jalna Crime | शेताजवळून बैलगाडी नेण्याच्या कारणावरून वाद; तरुणाला दगडाने मारहाण

पारध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Youth Assaulted

पारध : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे शेतातील रस्त्या वरून झालेल्या वादातून एका तरुणास दगडाने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी पारध पोलिस ठाण्यात एक जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगेश प्रभाकर आहेर (वय २०, व्यवसाय शेती, रा. पिंपळगाव रेणुकाई, ता. भोकरदन) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राधाकिसन तेजराव भोसले (रा. पिंपळगाव रेणुकाई) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही घटना २५ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता पिंपळगाव रेणुकाई शिवारातील गट क्रमांक २८२ येथे घडली. फिर्यादी व आरोपी यांची शेती एकमेकांच्या शेजारी आहे. आरोपीच्या शेताजवळून बैलगाडी नेण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी आरोपीने फिर्यादीस अश्लील शिवीगाळ केली. तसेच दगडाने छातीवर मारून दुखापत केली, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि यांच्या आदेशानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल पी. एन. सिनकर हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT