दोन कारची समोरासमोर धडक; शिक्षक ठार 
जालना

Jalna Accident : दोन कारची समोरासमोर धडक; शिक्षक ठार, एक गंभीर

जाफ्राबाद–जालना रोडवरील घटना

पुढारी वृत्तसेवा

जाफ्राबाद : जालन्यात दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.२२) सायंकाळी साडेचारच्या सुमारास जाफ्राबाद–जालना रोडवरील सावंगी–गोधनखेडा फाट्याजवळ घडली. विनोद बाबुराव कळंबे (वय ४४) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टेंभुर्णी येथील विनोद कळंबे हे (MH.२१ BQ.९५९५) क्रमांकाच्या कारने टेंभुर्णीकडून जाफ्राबादकडे येत होते. तर रामेश्वर नामदेव पवार (वय ४५) हे (MH.२८ EW. ४३२६) क्रमांकाच्या कारने जाफ्राबादकडून देऊळगाव राजाकडे जात होते. सावंगी–गोधनखेडा फाट्याजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढले व उपचारासाठी रुग्णालयात हलविले. गंभीर जखमी झालेल्या विनोद कळंबे यांना पुढील उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे टेंभुर्णी परिसरात हळहळ व्यक्त होत असून कळंबे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. विनोद कळंबे हे जाफ्राबाद तालुक्यातील नळवीरा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष रामधन कळंबे यांचे लहान भाऊ होते. दरम्यान, या अपघाताची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT