संशयित तरुण अमोल उर्फ गोटया साहेबराव गुजर   Pudhari Photo
जालना

जालना : वृद्ध महिलेच्या डोक्यात दगड घालून ठार मारण्याचा प्रयत्न

Jalna Crime News | वृद्धेच्या नात्‍यातील तरुणाचे कृत्‍य, प्रकृती चिंताजनक

पुढारी वृत्तसेवा

भोकरदन , पुढारी वृत्तसेवाः तालुक्यातील शेलुद येथील एका वयोवृद्ध नातेवाईक महिलेला तिच्या घरातील मुलाने दारूच्या नशेत डोक्यात दगड घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र नशीब बलवततर म्हणून सुदैवाने ही वृद्ध महिला बचावली असली तरीही तिची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

शेलुद येथील गंगुबाई पिराजी जाधव ही वृद्ध महिला मंगळवार एक एप्रिल रोजी ती राहत असलेल्‍या नातेवाईकांच्या घरात झोपलेली होती. त्‍याच रात्री बारा वाजेच्या सुमारास त्याच घरात राहणारा तिचा नातेवाईक तरुण अमोल उर्फ गोटया साहेबराव गुजर हा त्या ठिकाणी आला व त्याच्या वडिलांची नातेवाईक असलेल्या त्या महिलेची घर भाड्याने का दिले म्हणून वाद घातला. व तिला ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्या डोक्यात मोठा दगड घातला, महिला घरातच रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असताना तिला सोडून निघून गेला. दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी 2 एप्रिल रोजी सकाळी त्या वृद्ध महिलेच्या नातवाला फोन त्याने माहिती दिली की मी तुझ्या आजीचा खून केलेला आहे.

यानंतर संबंधित घरांमध्ये जाऊन बघितले असता त्याला त्याची आजी गंगुबाई पिराजी जाधव हि रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असून ती जिवंत असल्याचे दिसून आले त्यामुळे त्याने तिला लगेच बुलढाणा येथे हलविले व औषध उपचार सुरू केले मात्र त्या वृद्ध महिलेची प्रकृती जास्त चिंताजनक झाल्याने तिला गुरुवार तीन एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र अद्यापही त्या वृद्ध महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी पारद पोलिसांनी अमोल गुजर यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करून त्याला ताब्यात घेतले. अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी दिली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही.एस. नेमाने हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT