Jalna Accident | रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला कारने ठोकरलेः एकजण जागीच ठार  
जालना

Jalna Accident | रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला कारने ठोकरलेः एकजण जागीच ठार

कारमधील चारजण जखमी, भोकरदन- जाफराबाद रस्त्यावर अपघात

पुढारी वृत्तसेवा

भोकरदन: विरेगाव येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला कारने ठोस दिल्याने भीषण अपघात झाला या अपघात तालुक्यातील विरेगाव येथील श्रीकृष्ण मंडप डेकोरेटर्स चे मालक विलास सिताराम दळवी वय 55 वर्ष यांचा मृत्यू झाला आहे. तर कार चालकासह चार जण जखमी झाले आहे.

विलास सिताराम दळवी हे दुपारी 2 वाजेच्या दरम्यान घरा समोर भोकरदन- जाफराबाद रस्त्यावर दुचाकी क्रमांक एमएच सि डी- 7435 ही गाडी उभी करून अंकुश पुंडलिक दळवी यांच्याशी बोलत होते. त्‍याचवेळी जुई धरण पाटी कडून भोकरदन कडे येणारे गजानन तांदुळजे यांनी फोर्ड फियो ही चार चाकी गाडी क्रमांक एमएच 20 बी वाय -9908 ही गाडी भरधाव आली. व उभ्या असलेल्या विलास दळवी यांना जोराची ठोकर दिली त्यामध्ये विलास दळवी, हे गंभीर जखमी झाले. तर या अपघातात अंकुश दळवी यांना सुद्धा मार लागला तर कारचालक गजानन तांदूळजे,अस्मिता अरुण तांदूळजे, अथर्व तांदूळजे हे किरकोळ जखमी झाले आहेत.

सदर अपघात होताच गावातील नागरिकांनी तात्काळ या जखमींना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले डॉ मृणालिनी कासोद, डॉ दीपक सोननी यांनी प्राथमिक उपचार करून जखमींना प्रथम शहरातील दशरथ बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयात हलविले. नंतर सर्वांना छत्रपती संभाजीनगर येथे पाठविले आहे, या अपघातात गंभीर जखमी असलेले विलास दळवी यांना डॉक्टरानी मयत घोषित केले. विलास दळवी यांच्या पार्थिवावर सायंकाळी विरेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुनां व एक भाऊ असा परिवार आहे, ते विरेगाव येथील भाजपा कार्यकर्ते सुभाष दळवी यांचे मोठे बंधू होत. या प्रकरणात सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT