जाफराबाद : सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आंदोलन करताना शिवसेना उद्धव  pudhari photo
जालना

Jafrabad Shiv Sena protest : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनासाठी पाठिंबा

जाफराबाद तालुका शिवसेनेतर्फे आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

जाफराबाद : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील चोरी प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व नीट परीक्षा पेपर फुटीच्या विरोधात सोनम वांगचुक यांचे दिल्ली येथील जंतर मंतर वर सुरू असलेल्या अन्यायाग उपोषणाला पाठिंबा व शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आली.

जाफराबाद येथील हनुमान मंदिरात प्रभू श्रीरामाची आरती करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात तालुका शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनावेळी या सरकारचे करायचे काय,खाली मुंडके वर पाय, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या. प्रभू श्रीराम मंदिरातील चोरी प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासह शासनाच्या विरोधात विविध प्रकारच्या घोषणा शिवसैनीकडून देण्यात आल्या. परिसर दणाणू गेला होता.

यावेळी धरणे आंदोलनाला तालुका प्रमुख कुंडलिक मुठ्ठे, मुकेश माकोडे, चंदू शिंदे, विष्णू लोखंडे, गोविंदा माकोडे, नंदकिशोर भालके, समाधान चव्हाण,पंढरी उगले, विनोद शेळके, गजानन मुळे,दगडू तांबेकर, नागोराव बंगाळे,मोहम्मद फैसल, शेख इरफान, समीर शहा,सलमान पठाण,परमेश्वर सरोदे, बाबुराव मुळे,राजू लोखंडे अशपाक कुरेशी यासह आदी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT