Jalna Crime News : ड्राय डेच्या दिवशी अवैध बिअर विक्री; एक जण ताब्यात File Photo
जालना

Jalna Crime News : ड्राय डेच्या दिवशी अवैध बिअर विक्री; एक जण ताब्यात

शहरात ड्राय डेच्या दिवशी घरातून विनापरवाना बिअरची विक्री करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली.

पुढारी वृत्तसेवा

Illegal beer sale on 'Dry Day'; one person detained

जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरात ड्राय डेच्या दिवशी घरातून विनापरवाना बिअरची विक्री करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. या कारवाईत सुमारे १४ हजार ८० रुपयांची विविध कंपन्यांची बिअर जप्त करण्यात आली असून, सुनील रंगनाथ सर्जे (वय ५०, रा. राहुलनगर, जुना जालना) याला ताब्यात घेण्यात आले.

१५ ऑगस्ट रोजी ड्राय डे असल्याने अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक तेजवीर सिंह संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शोध सुरू केला. दरम्यान आरोपी हा आपल्या राहत्या घरातून विनापरवाना किंगफिशर, टुबर्ग, कॅनॉन, हायवर्ड्स आदी कंपन्यांच्या बिअरच्या बाटल्या आढळून आल्या. कारवाईत १४ हजार ८० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजवीर सिंह संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि सचिन खामगळ, पोउपनि राजेंद्र वाघ यांच्यासह पोलिस अंमलदारांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT