Jalna Crime News : सात लाखांची घरफोडी; आरोपीला घेतले ताब्यात  File Photo
जालना

Jalna Crime News : सात लाखांची घरफोडी; आरोपीला घेतले ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, भगतसिंग नगरात घडली घटना

पुढारी वृत्तसेवा

House burglary worth seven lakhs; Accused taken into custody

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील भगतसिंग नगर भागात झालेल्या घरफोडीचा काहीच दिवसांत उलगडा करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाला जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ६ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश बाबूराव वाढेकर (वय ४३, रा. भगतसिंग नगर, नवीन मोंढा, जालना) यांनी ३० ऑक्टोबर रोजी भाजीपाला विक्रीसाठी नाव्हा येथे गेल्यानंतर त्यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ७लाख रुपये रोख रक्कम चोरी केली होती. या घटनेची नोंद चंदनझिरा पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.

यानंतर पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला असता, गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार संशयित आकाश भास्कर लिखे (वय २५, रा. भगतसिंग नगर, जालना) याने ही चोरी केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी बदनापूर येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

त्याच्याकडून ६ लाख ४० हजार रुपये रोख, रु. २२,५०० किंमतीचा मोटो एज ६० फुटज मोबाईल, रु. ५०० किंमतीचे ब्लूटूथ हेडसेट, तसेच गुन्ह्यात वापरलेला आयटेल कंपनीचा बेसिक मोबाईल (किंमत रु. १,०र्टीळप ििशपएकूण रु. ६,६४,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई एसपी अजयकुमार बंसल, एएसपी आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि. योगेश उबाळे, सपोनि. सचिन खामगळ, पोउपनि. राजेंद्र वाघ, तसेच प्रभाकर वाघ, रमेश राठोड, सागर बाविस्कर आणि संदीप चिंचोले आदींनी केली.

साडे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपीकडून ६ लाख ४० हजार रुपये रोख, रु. २२,५०० किमतीचा मोटो एज ६० फुजन मोबाईल, रु. ५०० किमतीचे ब्लूटूथ हेडसेट, तसेच गुन्ह्यात वापरलेला आयटेल कंपनीचा बेसिक मोबाईल (किंमत रु. १,०००) असा एकूण रु. ६,६४,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT