आशा सेविकांचे मानधन रखडले file photo
जालना

ASHA workers : आशा सेविकांचे मानधन रखडले

फेब्रुवारीपासून वाढीव मानधनच मिळाले नाही; उपासमारीचे संकट

पुढारी वृत्तसेवा

Honorarium for ASHA workers delayed

पारध, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथील आशासेविकांचे मानधन वेळेवर जमा होत नसल्याने त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. वाढीव मानधन फेब्रुवारीपासून अद्याप खात्यात जमा झालेले नाही, तर नियमित मासिक मानधनाचेही चार महिन्यांपासून पैसे मिळाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आशासेविकांसमोर घरखर्च भागवायचा कसा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

पारध बुद्रुक येथे ७, पारध खुर्द येथे २ आणि पद्मावती येथे १ अशा एकूण १० आशासेविका पारध उपकेंद्रांतर्गत कार्यरत आहेत. गावागावांत आरोग्य विभागाच्या विविध योजना, लसीकरण, गर्भवती महिलांची माहिती, आरोग्य सर्वेक्षण, जनजागृती यासह शासनाच्या आरोग्यविषयक विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी या आशासेविका महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मात्र, नागरिकांच्या आरोग्यासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या या आशासेविकांनाच त्यांच्या मानधनासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

आशासेविकांना मिळणारे नियमित मासिक मानधन तब्बल चार महिन्यांपासून खात्यात जमा झालेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच फेब्रुवारीपासून वाढीव मानधनाची रक्कमही प्रलंबित असल्याने आर्थिक अडचणी आणखी वाढल्या आहेत. तातडीने मानधन देण्याची मागणी होत आहे.wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww

मानधनासाठी एवढी प्रतीक्षा का ? "आम्ही गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी नियमितपणे काम करतो. शासनाच्या आरोग्यविषयक विविध कामांची जबाबदारी पार पाडतो. मात्र, चार महिन्यांपासून नियमित मानधन मिळालेले नाही. वाढीव मानधनाची रक्कमही फेब्रुवारीपासून प्रलंबित आहे. घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे. त्यातच पाऊस नसल्याने शेतीचेही नुकसान झाले आहे. शासनाने आमच्या प्रलंबित मानधनासह वाढीव मानधनाची रक्कम तातडीने खात्यात जमा करावी."
- ज्योती बोडखे, आशासेविका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT