जालना : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आठ माणसामागे एक कॅन्सरचा रुग्ण आढळतोय. आज प्रत्येकाला रसायनमुक्त भाजीपाला, अन्नधान्य हव आहे. शेतीची खरी मशागत बैलाने होत असून ट्रॅक्टरने नाही. दूध व्यवसायात भारत देश जगात पहिल्या क्रमांकावर असून शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी दुग्ध व्यवसाय वाढवला पाहिजे, जनावरांची वाढ झाली तर शेणखत मिळून रसायनांची गरज पडणार नाही, असे मत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले.
जालना ज्येष्ठ नागरिक मंच, ज्येष्ठ नागरिक महिला मंच आणि शेतकरी मंच जिल्हा जालना यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिरत्न विजयअण्णा बोराडे यांना राज्यपाल बागडे यांच्या हस्ते ‘जालना गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. शुक्रवारी (दि.6) जे.ई.एस. महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या सन्मान सोहळ्यास महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष अशोक तेरकर, महिला आघाडी अध्यक्ष प्राचार्य डॉ. निर्मलाताई भोसकर- कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बौद्धिक क्षमता, तंत्रज्ञान भारतात पूर्वीपासून होते पण केवळ ग्रंथातच राहिले. आज विद्यार्थी दहावीपर्यंत पास होतात, पण पाया मजबूत होत नाहीत. कॉपीमुक्त परीक्षासाठी विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्यावर शिक्षक, प्राध्यापकांनी प्रयत्न करावेत तेव्हाच चांगली दृष्टी, माणुसकी, सभ्यता असलेला माणूस निर्माण होईल. असा विश्वास राज्यपाल बागडे यांनी व्यक्त केला.
सूत्रसंचालन मंचचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. रावसाहेब ढवळे यांनी केले तर ज्येष्ठ सदस्य प्रकाश गडवे यांनी आभार मानले. कार्यक्रमास खासदार डॉ. कल्याण काळे, माजी आमदार कैलास गोरंट्याल व विलास खरात, व्दारकाभाऊ पाथ्रीकर, बॅ. गांधी, नानासाहेब देशमुख, राजाभाऊ देशमुख, भास्कर अंबेकर, सुनील रायठठ्ठा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी आणि शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जालना ज्येष्ठ नागरिक मंच, ज्येष्ठ नागरिक महिला मंच आणि शेतकरी मंच जिल्हा जालनाच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
समाजकार्यात लोकांची मदत : बोराडे
कुटुंबात राजकारण, समाजकारणाचा वारसा मिळाला असला तरी राजकारणात अपघात झाले. राजकारणात आपले मन रमले नाही. परिणामी कुटुंबाचे राजकारण आपण पुढे नेऊ शकलो नाही. मात्र समाजकारणात अवतीभोवतीच्या सर्वांनीच मदत केली असून हा सत्कार सामूहिक प्रयत्नांचा आहे. अशा भावना व्यक्त करत सत्काराने पाय वर जातात आपण जमिनीवर आहोत. तथापि ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या सत्काराबद्दल विजयअण्णा बोराडे यांनी समाधान व्यक्त केले.
ज्येष्ठांनी आनंदी जीवन जगावे ः बुलबुले
ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य वाढावे, आनंदी जीवन जगण्याचा आस्वाद घेता यावा, यासाठी जालना ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात. शेवटच्या काळात ज्येष्ठ नागरिकांनी हताश न होता खळखळून हसले पाहिजे. आपले जीवन आनंदाने जगले पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांच्याही अनेक समस्या असतात. त्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे.
सन्मान सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती