जालनाः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीमशक्तीच्यावतीने मुंडण आंदोलन करण्यात आले.  pudhari photo
जालना

Jalna protest : हल्दानी येथील कथित शुद्धीकरणाचा मुंडण करून निषेध

भीमशक्तीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर

पुढारी वृत्तसेवा

जालना : उत्तराखंड राज्यातील हल्दानी येथील रामलीला मैदानावरील कथित शुद्धीकरणाच्या निषेधार्थ भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने मंगळवार, ( दि.१८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक मुंडण व पिंडदान आंदोलन करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष प्रकाश अण्णा घुले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी घुले यांनी उत्तराखंड राज्यातील हल्दानी येथील रामलीला मैदानावरील राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाषण केल्यानंतर त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून मंत्रोच्चाराद्वारे शुद्धीकरण करण्यात आले.

या प्रकाराचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. सामाजिक समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा आणि भारतीय संविधानाच्या मूलभूत मूल्यांच्या विरोधात जाणाऱ्या अशा प्रतिगामी प्रवृत्तींचा खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

यावेळी भीमशक्तीचे मराठवाडा सरचिटणीस भास्कर साळवे, डॉ.शिवाजी लहाने, सुरेश कोळे, दादाराव हिवाळे, आसाराम चोरमारे, सुनील तुरेराव, गौतम सदावर्ते, सुनील नावकर, समाधान शिंदे, अशोक साळवे आदी उपस्‍थित होेते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT