Gutkha Seized : साडेबारा लाख रुपयांचा गुटखा जप्त  File Photo
जालना

Gutkha Seized : साडेबारा लाख रुपयांचा गुटखा जप्त

भोकरदन तालुक्यातील वरूड फाट्यावर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Gutkha worth twelve and a half lakh rupees seized.

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा :

भोकरदन पोलिसांनी वरूड लाख फाट्याजवळ साडेबारा रुपयांच्या गुटख्यासह दोन पिकअप वाहने पकडून जप्त केली पिकअप वाहनांसह ३२ लाख ६४ हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.

गुप्त खबऱ्याद्वारे भोकरदन पोलिसांना माहिती मिळाली की मध्यरात्री दरम्यान दानापूर मार्गे दोन पिकअपमध्ये गुटख्याच्या गोण्या घेऊन वाहने भोकरदनकडे येत आहे. त्यांनी मिळालेल्या माहितीवरून पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी पोलिसांचे पथक तयार करून पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे, गणेश पिंपळकर, योगेश दळवी, सतीश दोडके, शरद शिंदे, या पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक गुटखा पकडण्यासाठी रवाना केल्या असता मध्यरात्री दरम्यान पिंपळगावकडून दानापूरकडे येत असलेल्या दोन पिकअप गाड्यांना थांबविले.

तपासणी करत असताना चालकाची चौकशी केली असतात दोन्ही गाड्यांच्या चालकांनी उडवाउडवीची उत्तरे देत गुटख्याच्या गाड्या घेऊन ते वरूड फाट्या मार्गे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून दोन्ही गाड्यां पकडून भोकरदन पोलिस ठाण्यात घेऊन आले.

याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रशांत अजिंठेकर यांच्या तक्रारीवरून सरफुद्दीन शेख जैनुद्दीन (बुऱ्हानपूर), शेख नदीम शेख नफीस (बुऱ्हानपूर), फिरोज खान मोहम्मद खान (रा. भोकरदन) या तिघा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे हे करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT